कसा सावरु. . . . .

Started by Csushant, June 03, 2015, 07:54:36 AM

Previous topic - Next topic

Csushant

सांग सखे कसा सावरु,
पहाटेच्या हुरहूरत्या स्वप्नांना,
मावळत्या चांदण्यांना!

सांग सखे कसा सावरु,
तुझ्या ओल्या केसांना,
नभातून सळसळणाऱ्या वीजांना!

सांग सखे कसा सावरु,
तुझ्या डोळ्यांतील आसवांना,
गर्द पात्यातून ओघळणाऱ्या दवबिंदूना!

सांग सखे कसा सावरु,
तुझ्या दुराव्यातल्या एकांताला,
चंद्राविना झगमगणाऱ्या चांदण्याना!!!