कुणावर तरी प्रेम करुन बघ

Started by Rajesh khakre, June 03, 2015, 11:49:38 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

कुणावर तरी प्रेम करुन बघ

कुणावर तरी प्रेम करुन बघ
जीवन कसं फुलून जातं
पंख नसले पाठीवर तरी
आकाशातही उडता येतं

मरतुकड़या शरीरातही मग
दहा हत्तीच बळ येतं
उलथून टाकील दुनिया सारी
एवढं कुठून सामर्थ्य येतं

उंच डोंगरावर जाऊन कधी
जोरजोराने ओरडावे वाटते
असल्या नसल्या आठवणीचे
काहूर मनात दाटून जाते

ग्रीष्मातल्या उन्हात सुद्धा
श्रावण मनात बरसून जातो
पावसाचा थेंब न थेंब
मनात अलगद झिरपत जातो

आभाळ वारे  चंद्र तारे
सगेसोयरे बनून जातात
दिन सांज असो निशा
भाव मनी दाटून जातात

एका प्रेमापुढे तेवढया
दुनिया सारी तुच्छ भासते
विश्वाचे सारे वैभव
त्याच्यापुढे शून्य असते

काहीच न करता कसे
जग जिंकल्यासारखे वाटते
लोकांनी मानले नाही तरी
राजा झाल्यासारखे वाटते

रोजची असते दुनिया तीच
नजर मात्र भारुन जाते
कुणावर तरी प्रेम करुन बघ
जीवन सुंदर किती वाटते
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com