....."आयुष्य".....

Started by Sachin Mali, June 04, 2015, 12:51:58 PM

Previous topic - Next topic

Sachin Mali

आयुष्य

आयुष्य म्हणजे नेमके काय कधीच कळत नाही
जन्म आणि मृत्यु मधले नातं सहज उमजत नाही

आयुष्य नावाच्या पानावर बरंच काही लिहायचे असते
स्वतःसाठी जगलो तर ते पान नेहमी कोरेच राहते

दुसऱ्यांसाठी आयुष्य जगणाऱ्या लोकांना एक जन्म कमी पडतो
आयुष्य जगावे कसे हे त्यांच्याकडे पाहून अर्थ कळतो

आयुष्यावर बोलायला मी कोणी संत नाही
देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकांना कसलीच खंत नाही

आई वडील कधीच स्वतःचे आयुष्य स्वतःसाठी जगत नाही
म्हणून म्हणतात देवाला सुद्धा त्यांची सर येत नाही

काही लोक खूप लवकर आयुष्याला कंटाळतात
आणि काही लोक संकटाना डोळ्यात डोळे घालून उत्तर देतात

मरून जर सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मिळाले असते
तर आयुष्यावर या जगण्यावर कोणीच प्रेम केले नसते

उद्याच्या जगण्यासाठी आज का मरावे
आत्ता या क्षणात आयुष्य आहे हे का नाही कळावे
आत्ता या क्षणात आयुष्य आहे हे का नाही कळावे


सचिन माळी
Ph: 9764987912
Email: - sachin7mali@gmail.com
Read My Other Poems On :- ''http://malisachin.blogspot.in/"
https://malisachin.wordpress.com/