तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय !!

Started by शितल, June 04, 2015, 06:25:39 PM

Previous topic - Next topic

शितल

हळूच तुला चोरून बघायचंय,
नजरेशी थोडं खेळायचं,
थोडं अवघड आहे रे ...
पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय   !!

तुझ्यावर थोडं रुसायचंय,
मनवन्याच्या प्रयत्नात तुझं प्रेम मिळवायचंय
थोडं अवघड आहे रे ...
पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय   !!

तुझ्याशी बोलताना शब्दांमध्ये अडकायचंय,
खांद्यावर डोकं टेकवून मन हलकं करायचंय,
थोडं अवघड आहे रे ...
पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय   !!

त्या उगवत्या सूर्याला भेटायचंय,
तुझ्या हातात हात घालून त्यालाही थोडं जळवायचंय,
जरा अवघडच आहे हे ...
पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय   !!

तुलाही एकदा मनवायचंय,
पुन्हा तुझ्या प्रेमात पडायचंय,
थोडं अवघड आहे रे ...
पण तुझ्या सोबत पुन्हा जगायचंय   !!


शितल ....... :) :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.




sameer2386

त्या उगवत्या सूर्याला भेटायचंय,
तुझ्या हातात हात घालून त्यालाही थोडं जळवायचंय,

Khup ch chaan

मिलिंद कुंभारे


शितल