.......राहून गेलं.....

Started by Prem Mandale, June 05, 2015, 05:48:30 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

.......राहून गेलं.....

प्रेमात पडतांना, तिला प्रेमात पाडायचं
राहून गेलं,

तोंड दुखेपर्यंत बडबडतांना, हवं ते
सांगायचं राहून गेलं.

ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल
ठेवून एक मुस्काटात,
हा अशुभ विचार करता-करता हवं ते
घडायचं राहून गेलं.

नुसताच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर
डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यात स्वतःला शोधतांना
माझ्याविना तिचं अडायचं राहून गेलं.

तिच्या ओढणीचा, खांद्याचा स्पर्श हवा-
हवासा वाटतसे नेहमी,
सांगीन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय
काढायचं राहून गेलं.

प्रत्येक भेटीनंतर ती जातांना घालमेल
जीवाची असह्य होई,
त्या दिवशीही ती निघाली अन..... तिला
अडवायचं राहून गेलं.....

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

पुजारी

ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल
ठेवून एक मुस्काटात,
हा अशुभ विचार करता-करता हवं ते
घडायचं राहून गेलं.

सुदैव माझं असं -
हो न म्ह्णता, ना न म्ह्णता
न ठेवून दिली होती
त्या अप्सरेने
एक मुस्काटात माझ्या.

माधव अं. पांढरीकर

अशाचसारखा एक शेर वाचल्याचे आठवते:
इरादे थे की दर्दे दिल सब उनसे मिलके कह देंगे एक दिन ।
मगर मिलके भी उनसे आज होता है न कल कहना।

माधव अं. पांढरीकर

मला जुन्या कविता आवडतात. या माध्यमातून मिळतील अभी आशा वाटते.