भेट तुझी माझी पावसातली...!

Started by Archana...!, June 09, 2015, 12:24:46 AM

Previous topic - Next topic

Archana...!

आज आठवली ती भेट तुझी-माझी पावसातली....
पहिल्या पावसाने आज पुन्हा ओली झाली...

पहिल्या वहिल्या प्रेमाचा तो पहिलाच पाऊस होता... प्रेमाचा साज लेऊन ऋतुही सजला होता...

बेभान वारा, अंगावरी शहारा... कळलाच नाही तो स्रुष्टीचा ईशारा...

कोण जाणे कसे आले आभाळही भरून... वार्याचा स्पर्श, जणू फिरे मोरपंख गालावरून...

विखूरले होते सर्वत्र रंग जणू प्रेमाचे... बहुदा सोहळाच करत होते सर्व आपल्याच मिलनाचे...

ये ना आता... अजून किती वाट पाहायची... कसली ही सवय तुझी मला त्रास द्यायची...

अोढ लागली आहे फक्त तुला पाहण्याची... पुन्हा नव्यावे तुझ्या प्रेमात पडण्याची...

ही वीज पण कशी.. अचानक कडाडली...ठोकाच चुकला ना ह्रुदयाचा... जेव्हा हाक तुझी कानी पडली...

भारावलेला तो क्षण... गुंतलेली नजर... जणू काळ ही थांबला, जेव्हा पाहिलं एकमेकांना...

कडकडणार्या वीजांनी... दोघेही भानावर आलो... शब्दांनी नाही... तेव्हा नजरेने बोललो...

एव्हांना दोघेही होतो चिंब भिजलेले... विसरून सार्या जगाला एकमेकांत हरवलेले...

सळसळणारा वारा... काहूरलेलं मन... दोघांसाठीही होते ते अनोळखी क्षण...

वार्याने तर आता हद्दचं होती केली... कसा अल्लडपणे वाहत होता... ओढणीच माझी सरकली...

थरथरत्या हाताने जी तूच मग सावरलीस... प्रेम तर होतेच पण त्याची मर्यादाही जाणलीस....

कहरच झाला हा वीजा कडकडण्याचा... उगाच दिला बहाणा तुझ्या मिठीत शिरण्याचा...

वाटलं आयुष्यभर असचं राहावं... तुझ्या मायेच्या मिठीत दु:ख सारं विसरावं...

पण प्रेमात सुखाच आयुष्य इतकं कुठे असतं... काहीच नशिबवान असतात ज्यांना हे सुख मिळतं...

पावसाची रिमझिम आता जरा थांबली होती... पण मनात मात्र ढगांची गर्दी जमली होती...

विरहाची ती वेळ पुन्हा जवळ येत होती... अन् तुझ्या प्रेमाची ती मिठी आज मला सोडवत नव्हती...

तरीही निघावेच लागले न्... सोडून ते गुंतलेले हात... पुन्हा त्या बेरंग जगात...

आसवांचा पाऊस आता डोळ्यांत दाटला होता... पुन्हा बरसेल ना.. हा प्रेमाचा पाऊस, प्रश्न मनास पडला होता...

सरणार्या त्या क्षणांना जरा थांबवावेसे वाटले... विसरून बंध सारे पुन्हा मागे फिरावेसे वाटले...

पहिल्यांदाच पाऊस इतका हवा हवासा वाटला... पण प्रेमाचा तो पाऊस पुन्हा कधीच नाही बरसला...

आताही पाऊस नुसताच बरसत असतो... जणू काही आपल्याच भेटीसाठी तो ही तरसत असतो...

भिजत असते मी ही... पण पावसाने नव्हे.. तुझ्या आठवणींचा स्पर्श असलेल्या... माझ्या डोळ्यांतील अासवांनी...!



अर्चना...!