स्त्री जन्मा...

Started by Parmita, December 08, 2009, 02:33:05 PM

Previous topic - Next topic

Parmita

स्त्री जन्मा...
अबोलपनाच्या गर्भातून जन्माला येत आणि   
फुलत जातं आपलं नात !
जन्माला येताना भिन्न असलो,
तरी एक समान दुवा जोडत असतो आपल्याला 
मनात दुख्खाचे कढ दाबत 
हसतच वावरत असतो आपण
पण न दिसणारया  अश्रूंची
धग जाणवत असते डोळ्यात
अन झिरपत असते मनात !
तुझे-माझे भावबंद जन्मोजन्मीचे
न तुटणारे... न संपणारे
कारण तुझं नकोस 'जीण'
जगत असतेस तू माझ्यात
आणि जपत असतेस अल्लादपणे
माझ्यातल्या 'तुला' ... !
पण तुझं तुलाही कळत नाही
कधी रेशिमाधागायचे  दोरखंड
मला वेधून घेतात आणि
रुतत जातात माझ्या मनात
कारण नकळतपणे.... अलवारपणे
तू माझ्यातही रुजवलेलं असतस
तुझ तेच नकोस झालेलं  'स्त्री' पण... !

प्राजक्ता...