* पावसात *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 15, 2015, 05:56:22 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* पावसात *
भिजु दे मला
आज या पावसात
उतरु दे प्रत्येक
थेंब माझ्या रोमरोमात

भरु दे हुडहुडी
थंडीची थोडी अंगात
उठु दे शिरशिरी
येता तु बाहुपाशात

मिटु दे तहान
माझी चातकाची जात
पिऊ दे पाऊस
तुझ्या ओठातल्या ओठात

उतरु दे प्रणयाला
आज तु नसानसात
होऊ दे तृप्ती
आग लागेल पावसात.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938