चारोळ्या~बिरोळ्या-8

Started by Rajesh khakre, June 15, 2015, 09:47:50 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

मृत्यु...!

क्षणाचा ही भरवसा नसताना
स्वप्ने मात्र हजार बघतो
कुणास माहीत कधी माणसा
मृत्यू हा येणार असतो

असल्या नसल्या क्षणांचेही
मनी मनसुबे रचत असतो
जगण्याची गोळाबेरीज
मृत्यु भागाकार ठरतो

मृत्युलाही घेऊन सोबत
जीवनाशी लढत असतो
कधी अलगद मृत्यु पकडील
त्याचा काही नेमच नसतो

क्षणापूर्वी जो गेला बोलून
परलोकाचा पाहुणा होतो
कधी अचानक कुणी एखादा
मनास चुणूक लाऊन जातो

जीवनाचे अन मृत्यूचे
गणित काही आगळेच असते
मृत्यूभिलाषी जगतो कितीक
जीवनाभिलाषी मरत असतो

मृत्यु आहे शेवटी म्हणून
जगण्यात ही मजा असते
कुणीतरी म्हटलेच आहे
मरणात खरोखर जग जगते
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com