-- नमन --

Started by SHASHIKANT SHANDILE, June 15, 2015, 01:06:34 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

नमन तुलारे  हे महात्मा नमन तुला माझा

देशासाठी झुरलास तू इंग्रजांशी भिड्लास तू
नवीन युग आम्हाला दिलसरे हा वरदान तू
नोटांवर तुझी प्रतिमा माणुसकी दाखवत आली
त्याच नोटांपाई आता माणुसकी विकल्या गेली
तुझी अहिंसा धुळी मिळाली नमन तुलारे माझा

तुझी अहिंसा जिवंत होती आता गाडली गेली
थोड्या थोड्या गोष्टींवरहि आता चालते गोळी
एका गाली पडता जी दुसऱ्या गाली पडत होती
ती झापड आता या लोकांना खुनी बनवून गेली
विसरले तुलारे हे महात्मा नमन तुलारे माझा

दिंडी चळवळी काढून इंग्रजांशी लढलास तू
तुझी अहिंसा जातांना घेऊन कां गेलास तू
धन्य तू आज नाही बघून फार रडला असता
तुझ्या अहिंसेचाहि नेत्यांनी खेळ केला असता
दुख होतेरे इथे जगतांना नमन तुलारे माझा

तुझनावाने गोष्टी मोठ्या करणी मात्र खोटी
भ्रष्टाचारात मानेवरी डुबली हस्ती इथे मोठी
भाऊ भाऊ आपसी भांडतो फक्त या पैशासाठी
बापालाही जीवे मारतो त्या एका तुकड्यासाठी
हेच होतं स्वप्न कारे तुझं नमन तुलारे माझा

भारतीय म्हणून लाज वाटावी आज हि स्तिथी
मरता मरता जगणे असले सतत वाटते भीती
ज्या तत्वांवर जगतांना तू दिली तुझी आहुती
परत कोण देईल आम्हाला अहिंसावादी विभूती
परत कोण देईल आम्हाला अहिंसावादी विभूती

भोगतोय शिक्षा स्वतंत्रतेची जो स्वतंत्र करून गेला
तरीपण नमन तुलारे हे महात्मा नमन तुला माझा

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!