स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

Started by AKSHAY BHALGAT, June 15, 2015, 05:08:43 PM

Previous topic - Next topic

AKSHAY BHALGAT

स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार
तुझ्याच आठवणींनी , त्यांना सजवलय फार

मिटता डोळे  दिसते ..., तूच सगळी कडे .,
उघडता क्षणी होतो ., सर्वत्र अंधार ...
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

निजता अंथरुणी ... ऊब तुझीच भासते ...,
घट्ट कवटाळता उशी ., झोप लागते गाढ ....
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

पाऊला - पाऊला वर होतो., भास तुझा चोहीकडे
स्पर्श करता तुज ., मन हि होते बेजार ....!
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

हलक्या - हलक्या बोलांची ,
आखीव सुंदर चारोळ्या .,
सांगड तुझ्या आठवणींशी ,
घाले कवितेच्या ओल्या .,
तुझ्या मोजक्या क्षणांशी .,
हितगुज होते फार ...।
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

अक्षय भळगट
१५.०६.२०१५