-- पहिला पाऊस --

Started by SHASHIKANT SHANDILE, June 15, 2015, 05:18:54 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

कोरडी माती हलकीच ओलावली
गडलेली बीजं ओलावता अंकुरली
अंकुरली बीजं पानानिशी बहरली
बहरती पानं उत्साहात डोलावली

कारण
पहिल्या पावसाने भिजली माती

शेतकरी रिकामा तो कामी झाला
त्याच्याही मनमंदिरी मोर नाचली
आले जणू सुखाचे दिवस म्हणून
यंदाही सुंदर स्वप्न बघू लागला

कारण
पहिल्या पावसाने भिजली माती

जनावर पक्षीही खूप सुखावली
पोटा पाण्याचीही सोय भागली
सारी धरणी आनंदाने भाऊकली
लेकरांना जणू संजीवनी गावली

कारण
पहिल्या पावसाने भिजली माती

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!