मी होतो किनारा

Started by amipat, June 15, 2015, 09:15:34 PM

Previous topic - Next topic

amipat

 

मी होतो किनारा आणि ती होती उधाणलेली लाट
थांबवावं वाटलं खूप तरी निसटून जायची स्पर्श करून   .

येताना यायची धावत,खळखळत अल्लड मुलासारखी
जाताना जायची माझ्याजवळ आठवणींचे शिंपले सोडून

तिचं येणं  ,कधी अलगद कधी बेभान होऊन आदळणं
झिजवत होतं मला कणकण जाणीव करून देत होतं काय ठेवलय वाढून

आता उरलोय कणाकणातून , अंगावर घेऊन भरावाची ओझी
आठवणींचे मोती घेऊन उरलोय तळाशी तिच्या परत येण्याची आशा घेऊन  ...............