नाती ............

Started by pallavi wadaskar, June 16, 2015, 02:33:46 PM

Previous topic - Next topic

pallavi wadaskar

आयुष्यात काही नाती
रक्तापलीकडली असतात
जीवनाच्या या प्रवासमध्ये
अशी नाती क्वचित भेटतात
मनाच्या या समुद्रामधे
वाळूपेक्षा मोतीच जास्त साठवले जातात
अमावसेला नसलेला चंद्र पण
गालातल्या गालात हसून मोकळा होतो
तशीच ही नाती आपलेसे करून घेतात
चंद्राला पण ईर्ष्या होईल
अशी चंद्रापेक्षा पांढरे शुभ्र मन
असलेली काही नाती जीवनात मिळतात
                           

http://manatilchandane.blogspot.in/

pallavi wadaskar