* फेसबुक कवी *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 16, 2015, 10:59:10 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


अक्कल नाही इथे ज्याला
आता तोही लिहु लागला
गावात नाही ओळख त्याला
अन फेसबुकला कवी झाला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Mayur Dhobale

मित्रांनो , शाळेतील मजाच अगदी निराळी होती.पण  ही मजा आता पुन्हा अनुभवता येणार नाही याची खुपच खंत वाटते , हिच खंत या कवितेतुन व्यक्त करन्याचा एक साधा प्रयत्न केलाय......कविता आवडली तर  तुमच्या जून्या शाळेला नक्की भेट द्या......छान वाटेल ...

Mayur Dhobale

        'शाळा'

त्या पंखात निराळाच होत बळं...
कितीही उंच  उडालो,
निघतच नव्हती कधी कळं...
शाळारुपी आभाळच होत फार मस्त ,
कधी बसुच वाटलं नाही ,
आम्हा चिमुरड्यांना स्वस्त ...
रंगीबेरंगी होत्या छटा ,
विविधतेत मस्त जगायचो...
मनाप्रमाणे वाटलं तेव्हा ,
वारयासंगे सुस्साट पळायचो ....
नव्हताच कधी आनंदाचा दुष्काळ ,
रोज होता नवा विचार ,
एक नवाच  आविष्कार .....
होती भिती मनात ,
पण थोडी थोडी ...
तिच्यातही का कुणास ठाव?
वाटायची इतकी गोडी .....
आता तर सारे पक्षी ,
फुकटचेच नटतात.....
बळ देणारे अमुल्य पंख ,
मोठेपणाच्या आड स्वहातानेच छाटतात....
'शाळा ' नावाचा हिट चित्रपट ,
मनाच्या screen वर नेहमीच झळकनार,
sequence मात्र त्याचा,
याजन्मी तरी नाही येणार , नाही येणार