**** शिकलोय मी आता ****

Started by Prem Mandale, June 17, 2015, 08:48:00 AM

Previous topic - Next topic

Prem Mandale

**** शिकलोय मी आता ****
.
शिकलोय मि आता तुझ्याविना
जगायला...
.
शिकलोय मि आता स्व:ताचाच
हात पकडुन चालायला...
.
शिकलोय मि आता रडु जरी आले
तरी स्व:ताचेच डोळे स्व:ताच्या
हाताने पुसायला...
.
शिकलोय मि आता ठेचकाळुन जरी
पडलो तरी स्व:ताच उठुन ऊभा
राहायला...
.
शिकलोय मी आता आयुष्याचा
पाया बांधायला...
.
शिकलोय मी आता तुझ्यासारखी
खोटी चेहरे ओळखायला...
.
शिकलोय मी आता २१ व्या
शतकातील मुलींना
ओळखायला...
.
शिकलोय मि आता एकटाच बसुन
एकटयाशी बडबडायला...
.
शिकलोय मि आता राग जरी
आला तरी स्व:तालाच
मनवायला...
.
शिकलोय मि आता स्व:ताची
काळजी स्व:ताच
घ्यायला...
.
शिकलोय मी आता न
सुटणारी कोडी
एकट्यानेच सोडवायला...
.
शिकलोय मि आता वेळेवर
जेवायला कारण आता
कुणी नाही जेवुन घे
म्हणायला ...
.
शिकलोय मी आता मनात खुप
दु:ख असतानाही जगासमोर
हसायला...
.
शिकलोय मी आता मित्रांमध्ये
गप्पा मारायला...
.
शिकलोय मी आता सगळ्यांना
वेळ द्यायला ...
.
शिकलोय मी आता झोपतानी
स्व:तालाच ...
Good Night ...
Love You ...
Miss You... बोलायला...
.
सगळ काही शिकलो पण
नाही शिकलो तुला
विसरायला...
.
आणि...
.
शिकलोय मी आता तुझ्या
प्रत्येक आठवणीवर
कविता करायला...
.
माझ्या कवितांपैकी
एक कविता...
.


स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref