"घर"

Started by Sachin Mali, June 17, 2015, 10:18:04 AM

Previous topic - Next topic

Sachin Mali

घर

घर म्हणजे घर पाहिजे नकोच नुसत्या भिंती
घरा मध्ये आपुल्या असतो मायेचा ओलावा किती

भांडण तंटा रुसवे फुगवे येथे सुरूच असतात
पण दुःखाच्यावेळी येथे आपलेच डोळे पुसतात

बाबा माझे या घराचे छत आहे
माय माउली प्रत्येक संकटाला पाठीशी उभी राहे

प्रत्येक सण असतो आमुच्यासाठी दिवाळी आणि दसरा
आई म्हणते बाबांना मुलांसाठी सगळे कष्ट विसरा

माझ्यासाठी माझे घर आहे मंदिरापेक्षा मोठे
या घरातील सुख तुम्ही शोधणार तरी कोठे

या घरातील माझ्या आठवणी आहेत गोड आणि कडू
या घराला सोडताना किती येणार रडू 
किती येणार रडू


सचिन माळी
Ph: 9764987912
Email: - sachin7mali@gmail.com
Read My Other Poems On :- ''http://malisachin.blogspot.in/"
https://malisachin.wordpress.com/