पुन्हा अंधारली रात...!

Started by Archana...!, June 18, 2015, 12:35:04 PM

Previous topic - Next topic

Archana...!

पुन्हा अंधारली रात... आली जाग आठवांना...
पुन्हा समोर तू माझ्या...कसा खेळ हा भासांचा...
आज उधान हा वारा, गंध तुझा त्यात आला...
पुन्हा धुंद झाले मन, देह शहारून गेला...

बंध प्रेमाचा रे सांग, आता तुटेल तो कसा...
मन राहीले न माझे, जीव तुझ्यात गुंतला...
कसे सजले नभात, आठवांचे ते चांदणे ...
छंद त्यांना टिपण्याचा, असा मनास जडला...

आज उगाच वाटले, चंद्र होऊनी जगावे...
रोज उतरूनी नभी, फक्त तुला रे पाहावे...
जेव्हा होईल रे कधी, स्पर्श तुला किरणांचा...
तुझ्या मिठीत येण्याचा, मला मिळेल बहाणा...

आस उरली मनात, भेट व्हावी एकदाच...
साठवेन रूप तुझे, खोल माझ्या पापण्यात...
शोधोन मलाही, तुझ्या त्या गहिर्या डोळ्यांत..
पुन्हा खेळावासा वाटे, लपंडाव तो प्रेमाचा...

शब्दांची ही फुले, तुजसाठी वेचते मी...
गुंफूनी त्यांच्या माळा, तुलाच अर्पिते मी...
रित माझी रे प्रेमाची, जरी असेल वेगळी...
खंत एवढीच मनी, ती न तुला रे कळली...

पुन्हा परतूनी जेव्हा, कधी येशील माघारी...
पायवाट रे तुझी ती, बघ असेल सजलेली...
माझ्या शब्दरूपी फुलांनी, हळूवार भावनांनी...
गंध त्या फुलांचा, पुन्हा दरवळतो आहे,
आस तुझ्या येण्याची, पुन्हा जागवतो आहे...

आस तुझ्या येण्याची, पुन्हा जागवतो आहे...


अर्चना...!

मिलिंद कुंभारे

पुन्हा परतूनी जेव्हा, कधी येशील माघारी...
पायवाट रे तुझी ती, बघ असेल सजलेली...
माझ्या शब्दरूपी फुलांनी, हळूवार भावनांनी...
गंध त्या फुलांचा, पुन्हा दरवळतो आहे,
आस तुझ्या येण्याची, पुन्हा जागवतो आहे...

छान.....अप्रतिम .....आवडली कविता .... :)