माझी माय

Started by sanjay limbaji bansode, June 18, 2015, 06:31:51 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

दुष्काळाच दिस होतं घरात नव्हतं काही
मह्या पोटासाठी माय उपाशीच राही !!

नव्हता घरात दाणा होतं रिकामं भगूण
ढसा ढसा रडत होती मला ती बघूनं !

बाप माझा शेतकरी करीत होता शेती
गाळीत होता घाम तरी हाती त्याच्या माती !

रानोरान हिंडुन माय सरवा पहात जाई
मह्या पोटासाठी माय उपाशीच राही !!

गळत होतं घर जव्हा फुटकी होती पत्र
मह्यासाठी जागत होती माय दिवस रात्र !

कांडून भात पाजत होती मला ती पेसं
पाणी पिऊन काढीत होती मह्यासाठी दिसं !

बाप जाऊन परगावी काम दूसरे पाही
मह्या पोटासाठी माय उपाशीच राही !!

जाऊन जंगलात माय, लाकडं गोळा करी
विकून गावात त्याला, आणी ती भाकरी !

अंधारात जीवन जरी उजेडाची आसं
दूर दूर दिसत नव्हता आसेचा प्रकाश !

दारिद्रय़ाच जीनं तरी ती झेलत जाई
मह्या पोटासाठी माय उपाशीच राही !!


कवी - संजय बनसोडे
9819444028

Chony Basnet

this is the best poem that gives perfect descriptions of any mother living in village and fights against poverty... I'm inspired by this poem.. this is really great... keep writing

Vikas Vilas Deo


sanjay limbaji bansode


mangal more

its a very nice poem there is all mothers like that so its very touching to my heart sir please keep it up.


vishali umaji pal