निळं वादळं वादळं

Started by sanjay limbaji bansode, June 19, 2015, 03:12:35 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

निळं वादळं वादळं
दहा हत्तीच रं बळं !
निळ्या आकाशी रं खेळं
जय भीम, वाजवी संबळ !
निळं वादळं वादळं
दहा हत्तीच रं बळ !!



निळ्या वादळाची जातं
राही निळ्याच शहरातं
दया मया काळजात
लई प्रेमाळू रं जातं !
त्याला लाभलं स्वबळं
निळं वादळं वादळं
दहा हत्तीच रं बळं !!


वंश  त्याचा  रं  नागाचा
जबडा त्याचा रं वाघाचा
कैवारी  दीनदलिताचा
कर्दनकाळ  दुश्मनाचा
केलं रक्ताच रं तळं  !
निळं वादळं वादळं
दहा हत्तीच रं बळं !!


कवी - संजय बनसोडे
9819444028