प्रेम आहे माझ तुझ्यावर

Started by sameer2386, June 19, 2015, 06:59:58 PM

Previous topic - Next topic

sameer2386

कशी आहेस?  कुठे आहेस?
आठवण येते का माझी तुला?
काही सांगायचं होतं मला..

प्रेम आहे माझ तुझ्यावर,
तू भेटल्या क्षणी सांगायचं होतं,
कोणी तुला नेउन तर नाही ना जाणार...
म्हणून देवाजवळ मागायचं होतं,

तुझ्या बरोबर आयुष्य जगावं,
हे मनाशी मानलं होतं..
हसत रडत कसाही जगेन,
हे हृदयात बिंबवल होतं..

आयुष्यभर हातात हात तुझा,
हेच मी इच्छिलं होतं...
संकटावर मात करू सारी,
मन मला सांगत होतं...

कठीण असतात मार्ग जीवनाचे,
कोणीतरी मला सांगितलं होतं...
प्रेम करून पाहायचेय एकदा,
मन काही ऐकत न्हवतं....

              -- समीर प्रकाश कदम


शितल