शाळेत नको गं आई,

Started by Sachin01 More, June 20, 2015, 01:39:07 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

शिक्षणाच्याबाजारात नको आई मला मोकाट रानामधी जाऊ दे.

शाळेच्या शिस्तीतगुंतवू नको मला ताई अन् दादा संग भांडण करु दे.

बाई चे पाठं नको गं आई मला आजी ची गोष्टच ऐकू दे.

निकालावरुन माझा भाव नको गं आई मला पोरकटपणा एकदाचा अनुभवू दे.

स्पष्ट वाक्या नको ग मला आई, लाडात थोड बोबडं बडबडू दे.
टाय अन् शर्टीँग चा चक्कर नको आई मला, चिखलात थोडा शर्ट फाडू दे. नव्या जमान्याच शहाणपण नको आई, मला तुझा बदमाश अन् शरारती कारटच राहू दे..

शाळेपायी मला सकाळीच नको उठवू आई,

चिमणीसारख उशीरापर्यत मनसोक्त कुशीत राहू दे.

लहानग्या माझ्या डोक्यात प्रश्न नको टाकू गं आई,

मला पाखरासारखी स्वप्ने पाहू दे.

फुशारकी साठी मला शाळेत नको गं आई, माझ्या आनंदासाठी आजी-बाबा संग खेळू देँ

Moregs