गाव..,

Started by Ravi kamble, June 20, 2015, 03:32:15 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

गाव...,
********************
गाव आमचं सुधारलं
शहराजवळ आलं
इतकं जवळ आलं
आमच गावच गायब झालं

टिपुस पडता पाण्याचा
दरवळे सुगंध मातीचा
या शहरी करणामुळे
पसरला दुर्गंध गटारिचा

गायब झाला गावचं पार
ना उरला खेळाया मैदान
इंटरनेटच्या अतिवापरानं
पोरं होऊ लागली सैतान

नको वाटते शहरीकरण
छोटच प्यारं माझं गाव
सगळी संपली माणुसकी
नाही कुणा कुणाचं भाव

(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)

Nagesh Mane


Nagesh Mane