अजित….

Started by विक्रांत, June 20, 2015, 08:29:19 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


दारिद्राचे दु:ख काय असते
दारुड्या बापाचे दु:ख काय असते
हे मी पहिले होते
माझ्या जिवलग मित्राच्या घरात
आणि तरीही
कष्टावर अतुट विश्वास ठेवून
आपलं भविष्य घडवतांना
मी पाहिले होते त्याला
तेव्हा मला दिसले
जीवनाचे दलदलीतून उमलणारे
कमळासम रूप
आणि कळली
बरड जमिनीवर तग धरणारी
इवल्या रोपाची असीम जिगीषा
चांगुलकी सहृदयता
प्रामाणिकता मित्रता
कुठल्याही स्थितीत जिवंत राहू शकते
याचे प्रत्यक्ष दर्शन त्याच्या रुपात
जीवनावरील माझे प्रेम
द्विगुणीत झाले तेव्हापासून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in