शाळा

Started by Mayur Dhobale, June 21, 2015, 02:57:53 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

मित्रांनो , शाळेतील मजाच अगदी निराळी होती.पण  ही मजा आता पुन्हा अनुभवता येणार नाही याची खुपच खंत वाटते , हिच खंत या कवितेतुन व्यक्त करन्याचा एक साधा प्रयत्न केलाय......कविता आवडली तर  तुमच्या जून्या शाळेला नक्की भेट द्या......छान वाटेल ... :)

        'शाळा'

त्या पंखात निराळाच होत बळं...
कितीही उंच  उडालो,
निघतच नव्हती कधी कळं...
शाळारुपी आभाळच होत फार मस्त ,
कधी बसुच वाटलं नाही ,
आम्हा चिमुरड्यांना स्वस्त ...
रंगीबेरंगी होत्या छटा ,
विविधतेत मस्त जगायचो...
मनाप्रमाणे वाटलं तेव्हा ,
वारयासंगे सुस्साट पळायचो ....
नव्हताच कधी आनंदाचा दुष्काळ ,
रोज होता नवा विचार ,
एक नवाच  आविष्कार .....
होती भिती मनात ,
पण थोडी थोडी ...
तिच्यातही का कुणास ठाव?
वाटायची इतकी गोडी .....
आता तर सारे पक्षी ,
फुकटचेच नटतात.....
बळ देणारे अमुल्य पंख ,
मोठेपणाच्या आड स्वहातानेच छाटतात....
'शाळा ' नावाचा हिट चित्रपट ,
मनाच्या screen वर नेहमीच झळकनार,
sequence मात्र त्याचा,
याजन्मी तरी नाही येणार , नाही येणार ....
     


poem from fb page 'mazi kavita'