पुढचा जन्म ती फक्त त्याचासाठीच घेईल …

Started by शितल, June 21, 2015, 04:44:03 PM

Previous topic - Next topic

शितल

आठवणीत त्याच्या एक चिट्ठी लिहिली होती
साठलेलं प्रेम सारं व्यक्त करत होती
जरा हातात घेऊन तिने एकट्यात वाचली
अचानक काय झाले तिने फाडूनच टाकली
भानावर येउन ती विचारात गेली
पोहचवण्या अगोदर तिने का ती फाडली ?
उत्तर शोधता तिला सापडेना काही
विचारात त्याच्या पुन्हा भूतकाळी जाई
त्याला तेव्हा थोडा वेळ हवा होता
नातं समजायला तो नवा होता
अगोदरच तिच्या घरी ती अडचण होती
लग्नाची तिच्या त्यांना घाई झाली होती
तिला त्याच्याशिवाय कोणी सुद्धा नाही
तो वेडा विचारात त्याला कळेनाच काही
एवढा कसा शंड तिचं प्रेम कळेना
किती झुरते ती त्याला अश्रू दिसेना
रागानेच तीही त्याला शेवटी म्हणाली
अखेरची भेट पण आयुष्य संपवणार नाही
तू हि त्यात आहेस हे विसरू कशी
पुन्हा कधी हसताना तुला दिसणार नाही
त्याच्या प्रेमासाठी स्वतःला शिक्षा दिली
स्वतःहून तिने त्याची साथ सोडली
रागानेच तिने लगेच लग्न केले
स्वतःच्या हाताने सारं दुखः गोळा केले
नवऱ्याच तिचं कधी पटलच नाही
त्याच्या माराने तिही थकली नाही
नवऱ्याचा मार तिला त्याचं प्रेम भासे
डोळ्यांत त्या पाणी आणि ओठांवर हसे
वागते अशी जणू काही घडलेच नाही
तो ही तिचं दुखः तिच्या डोळ्यांतून पाही
अजूनही आसं तिला त्याच्या भेटण्याची
प्रेमाचा तो श्वास तिही घेईल जराशी
जरी आज ती त्याची होऊ शकली नाही
पुढचा जन्म ती फक्त त्याचासाठीच घेईल ...


शितल .........




शितल



शितल