……त्याचा प्रतिसाद ………

Started by शितल, June 21, 2015, 05:04:55 PM

Previous topic - Next topic

शितल

[तिने लिहिलेल्या चिट्ठीचा त्याने दिलेला प्रतिसाद तो हि तिच्या स्वप्नात ]

पहाटेच आज तिच्या स्वप्नात तो आला
चुकूनच त्यानेही तिला फोन केला
आवाज तो त्याचा तिच्या हृदयात बसला
"कसा आहेस ?" विचारता तो किंचित हसला
उत्तर ते टाळून विचारले तिला
कवितेचा नाद तुझा, किती गं तो खुळा?
एवढ्या स्पष्ट भावना, त्या कशा मांडतेस?
हल्ली शब्दा-शब्दात, तू मला पाहतेस
नाकळावे त्याला म्हणून, तीच नकारली
अशी काही कविता मी नाही केली
एवढेच बोलून, ती थोडी शांत झाली
तिच्याशी बोलण्याची आता त्याला घाई झाली
बोल ना गं जरा, अशी गप्प नको राहू
ऐकताना मला, नको विचारात जाऊ
तुझं शांत राहणं, मला नेहमी सतवत
तुझ्या गोड आठवणी, त्याही छळतात
गुन्हा काय माझा तो एवढासा होता
प्रेमात पडण्याचा, माझा विचार नव्हता
दूर गेलीस तेव्हा, कुठे जाणवलं काही
विरहात जळण्याला आता पर्याय नाही
शब्द त्याचे तिला, खूप सलत होते
ओठ मुके झाले, पण अश्रू बोलत होते
आठवणी माझ्या, तुला किती त्रास करतात
विसर न त्या, तुला किती छळतात
माझ्याकडे बघ, कसा मी ही सावरतोय
दुःख मागे सोडून कसा, स्वतःला आवरतोय
तू ही जरा सावर, नको वेड्यागत बसू
पुसून घे डोळे, ठेव चेहऱ्यावर हसू
तुझा चेहरा मला, हसरा आवडतो
त्याला पाहूनच, मी ही हसाया शिकतो
शेवटचा त्याने तिचा निरोप घेतला
"खुश रहा गं तू " बोलून फोन ठेवला
त्याचं नाव घेऊन तिने हुंदका सोडला
बोलायचं बरंच काही, नाही शब्द फुटला
झोपेतून जागी झाली, तिचे पाणावले डोळे
स्वप्नीच बोले हा, सत्यात काही वेगळे .........



शितल ..........
[खरंच एक वेडी कविता आहे हि (शितल) त्याची]