फक्त माझेच पप्पा...!

Started by Archana...!, June 21, 2015, 09:39:08 PM

Previous topic - Next topic

Archana...!

माझे पप्पा...! The world best father, आज खास तुमच्यासाठी..., माझ्याकडून ही एक भेट...!

कळले न मला कधी ते बापाचे ह्रुदय,
जे नेहमीच धडपडत राहीले माझ्या सुखांसाठी...
जाणवले न मला कधी ते कवच कणखर,
जे नेहमीच होते भोवती माझ्या रक्षणासाठी...!

ठेचाळले असतील कित्तेकदा पाय तुमचे,
सोसल्या असतील असंख्य वेदना तुमच्या या लेकरासाठी,
पण एकदाही न पाहीला मी टिपुस तुमच्या डोळ्यांमध्ये...!

तुमचे ते कठोर बोलणे दुखावत होते मनाला...
उमजले न कधी, तुमचे प्रेम त्यामागील या भाबड्या जीवाला...
लढण्या जगाशी बळ दिले नेहमीच तुम्ही मला...
डगमगल्या पाऊलांना आधार नेहमीच तुमचा मिळाला...!

निस्वार्थ भावनेने नेहमीच पाठीशी असणारे माझे पप्पा...!
आभाळागत अफाट माया असलेले फक्त माझेच पप्पा...!

आता कळतो आहे, अर्थ खरा जगण्याचा मला...
आठवतो आहे, तुमचा शब्दन् शब्द प्रत्येक क्षणाला...!

कळत नकळत दुखावल असेल मी तुम्हाला,
माहीत आहे, त्यासाठी नक्कीच माफ कराल मला...!

पण खरचं कळल, दुनिया ही नव्हे फक्त स्वप्नांची,
इथे मेहनतीच्या वाटांवरच मिळती शिखरे यशाची...
नक्कीच गाठेन मी ही यशाचं शिखर,
जेव्हा साथ आहे मला तुमच्या आशिर्वादांची...!

शेवटी एकच प्रार्थना बाप्पाला करेन,
जन्मोजन्मी हे पप्पा फक्त माझेच असूदेत...!


Love you पप्पा...!


अर्चना...!