पावसानेही थोडं भिजावं..

Started by प्रशांत दादाराव शिंदे, June 23, 2015, 03:30:21 PM

Previous topic - Next topic
ह्या पावसाने  हि  थोडं भिजावं
अगदी  तुझ्यासारखं...

तु भेटतेस तसेच भेटावं
त्याच स्पर्शाने ....

ओठांवर  तुझेच  नाव असावं तसेच त्यानेही ओरडुन सांगावं
प्रेमऋतुत ह्या फुलांनी पुन्हा फुलावं तुझ्याचसाठी....

तुलाही भेट  आठवावी मग
चिंब तु भिजताना
मी थांबवत अडवत जरा  होती तारांबळ ती माझी ....

तु सारंकाही पहावं
पुन्हा पावसानं  यावं
थोडं भिजावं अगदी  तुझ्यासारखं

पुन्हा तुला  आठवावं
पुन्हा तु भेटावं
विसरुन सारे  रुसवे

©प्रशांत डी. शिंदे....