* ती *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 23, 2015, 03:56:36 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* ती *
मला न बघता माझ्यावर
मनापासुन प्रेम करणारी ती
माझी प्रत्येक कविता नेटवर
न चुकता वाचणारी ती

मनातल्या मनात मलाच आपलं
सर्वस्व बहाल करणारी ती
असुनही जवळ माझा नंबर
मेसेज न करणारी ती

आपल्या मैञिणींमध्ये माझ्या नावावर
मैञिणींशी मुद्दाम भांडणारी ती
वॉट्स अपवरुन माझे फोटो
डाउनलोड करुन बघणारी ती

वडापाव खावा की नाही
हेही माझ्या फोटोला विचारणारी ती
वेडी होऊन वेड्यासारखी माझ्यावरच
जीवापाड जीव लावणारी ती

पंधराव्या नक्षञाची कहाणी स्वाती
दवाचा थेंब जणु ती
पडता शिंपल्यात होते मोती
त्याच्याहुनही मौल्यवान आहे ती

न राहवुन एका वर्षाने
शेवटी मला मेसेज करणारी ती
माझ्यावरच प्रेम रडुन रडुन
मला प्रेमाने समजावणारी ती

चार दिवसांचे प्रेम देउन
मला एकट सोडणारी ती
काय होती चुक माझी
न सांगता जाणारी ती

आयुष्यभर मरण आता तिच्यावाचुन
अशी मध्येच सोडुन जाणारी ती
माझ्यावर एवढं प्रेम करणारी
आता कुठे आहे ती ?
कवी-गणेश साळुंखे.

Archana...!

खूप छान आहे कविता... मला माझीच आठवण करून दिलीत... :)