वाट पाहतो तुझी

Started by yallappa.kokane, June 25, 2015, 11:05:01 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

वाट पाहतो तुझी

मुसळधार पाऊस आज
बाहेर कोसळत आहे,
आठवणीत तुझ्या मन
आसवे ढाळीत आहे ।

ढग दाटून आले
पाऊस ऊभा स्वागताला,
वाट पाहतो तुझी
बाहू आतुर मिलनाला ।

संपली प्रतीक्षा चातकाची
तो ही तृप्त झाला,
दे दर्शन तुझे आता
मी काय गुन्हा केला? 


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ जून २०१५

९८९२५६७२६४


यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर