बालपण

Started by shailu_c, June 26, 2015, 10:22:06 AM

Previous topic - Next topic

shailu_c

बालपण

"बालपण" शब्दातच सर्व काही आहे.
खुप मस्त होत ते, ना कसलं टेन्शन व ना कसली  जंझट.
आपली स्वतःची दुनिया होती ती.
१-२ वा ५ रुपयात खूप ऐश होयची.
तेव्हा तर वडापाव पेक्षा चटणी व भजी पाव जास्त प्रिय होता कारण तो स्वस्त नी मस्त होता.
वर्गात तास तर चिंच, बोरं श्रीखंड व बडीशेप गोळ्या खाण्यात जायचा.
खुप मस्त होत ते बालपण
कोणी आवडली की ते खास मित्र व नजरे शिवाय कोणालाही कळायचे नाही.
परीक्षेच आम्हाला कधी काही वाटलच नाही पास होणार हे माहिती होत आणि % च ही तसं  काही नव्हते कारण शिष्यवृत्ती कधीच  आम्हाला मिळाली नव्हती .
खूप मस्त होत ते बालपण

खरच खूप मस्त होत ते बालपण
शाळा आणि मित्रांच्या दुनियेतील एक साठवण.
ना कशासाठी  कधी करावी  लागली वणवण आता उरली फक्त त्याची आठवण.

खरच खूप मस्त होत ते बालपण.