बाप

Started by SANJIVANI S. BHATKAR, December 09, 2009, 03:06:04 PM

Previous topic - Next topic

SANJIVANI S. BHATKAR

बाप

आई  घराचं  मांगल्य  असते ,
तर बाप घराचं अस्तित्व  असतो ,
आईकडे  अश्रुचे  पाट असतात ,
बापाकडे संयमाचे घात असतात,
ज्योतीपेक्षा  समई जास्त तापते ,
ठेच  लागली  की आईची  आठवण येते ,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या  स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी  व्यथा दडपवणारा बाप,
मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते
मुलगी बापाला जाणते
किती ग्रेट असतो ना बाप !



सौ. संजीवनी संजय भाटकर