अजुन ही

Started by rajeshreekamble, June 27, 2015, 01:55:20 PM

Previous topic - Next topic

rajeshreekamble

जखम झालीय खरी, वेदना ही आहेत, पण रक्त नाही..
त्या क्षणांच्या बंधणातून, अजुन ही मी मुक्त नाही...

भटकत फिरतेय एकटीच, आठवणींच्या गर्दीत, पण निवारा नाही..
अथांग प्रेमाच्या सागराला, अजुन ही किनारा नाही..

असे ही नाही की मला स्वतःला, सावरता येत नाही,
पण अजुन ही आलेले अश्रू , मला आवरता येत नाहीत,

हात रोज जोडते मी, पण देवा कडे तुला मागता ही येत नाही,
जिवंत आहे  मी, पण मला मना सारख जगता ही येत नाही..


--राजश्री

santosh mahale

Khoop  chan Kavita aahe .rajshri majhya babtit hi Asch ghadla aahe .me pan khoop mothya virahat jagato aahe.
Pan tujhya Kavita ne majhe man ajun CH gahivarun aale thanks


sunil N kundhare