आठवण तिची येता

Started by sammadival, June 27, 2015, 08:23:32 PM

Previous topic - Next topic

sammadival

आठवण तिची येता; मना वेगळीच चाहूल लागते, नि:शब्दी ओठी; एक कविता जुळूण येते... शब्द सारे ओठांतच अडकतात; समोर जेव्हा ती दिसते, पाहता तिला वाळवंटी रानी; नाजुक कळी फुलते... स्वप्नफुलांची बाग; मग अशी बहारते, तिच्या प्रेमळ स्पर्शाने; फुल न फुल गंधाळते... गंधाळलेल्या रानी ती ; फुलपाखरा गत भासते, देखणे सुःखद रूप तिचे; माझिया मना भूलवते... तिच्या डोळ्यांतली नशा; मला बेहोश करुण जाते, सगळे काही विसरवूण मला; ती स्वप्नात नेवूण पोहचवते... पापण्यांनखाली हलकासा ओलावा जाणवतो; जेव्हा फसवे स्वप्न हे माझे मोडते, अन् तिच्या आठवणीने; मन पुन्हा एकदा गहिवरते....

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827