दार उघड विठ्ठला

Started by sanjay limbaji bansode, June 29, 2015, 07:08:49 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

आषाढी एकादशी निमित्त माझ्या वडिलांची ईच्छा आहे की मी विठ्ठलावरही कवीता करावी.
त्यांना मान देऊन व ही कवीता त्यांना समर्पित करून सादर करीत आहे.



महाराचा चोखा आला तुझ्या भेटीला
विठ्ठला विठ्ठला दार उघड विठ्ठला !!

माझ्या संगे राबीला, तू का रे बाटला
महाराचा चोखा तुला तुझा कारे वाटला
येऊन पडक्या झोपड्यात, तू कारे नटला
विठ्ठला विठ्ठला दार उघड विठ्ठला !!

आलो तुझ्या दारी, खा रं माझी शिदोरी
लसूण मिरचीवरी, संग बाजरी भाकरी
आलो पायी पायी ये अर्ध्या वाटेला
विठ्ठला विठ्ठला दार उघड विठ्ठला !!

बघ तुझे बरवे, घालती चोरीचा आळ
आहे तुझ बाळ, कर माझा सांभाळ
उरी माझ्या तुझा, भक्तीभाव दाटला
विठ्ठला विठ्ठला दार उघड विठ्ठला !!

मेलों तरी मी रं, नवल साऱ्या वाटलं
एकएक हाड माझ बोले विठ्ठल विठ्ठल
महार म्हणून मी रं, तुझ्या  पायरीलाच सोडला
विठ्ठला विठ्ठला दार उघड विठ्ठला !!


संजय बनसोडे
9819444028