$$ प्रितीच फुल $$

Started by विजय वाठोरे सरसमकर, July 01, 2015, 05:27:08 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

$$  प्रितीच फुल  $$

तिची ती मनमोहक अदा
माझ्या मनाला वेड लावत
तिला बघताच क्षणिक
माझे मन स्थब्ध होऊन राहत

तू दिला प्रेमाचा अर्थ  नवा
म्हणूनच कवितेच्या ओळी लागल्या जुळू
आठवताना ते विरहाचे दिवस
नयनातून अश्रू लागतात गळू

तू असतांना मन प्रफुल्लीत व्हायचं
तुझ्या सहवासात प्रितीच फुल उमलायच
तुला बघतांना मन एकाग्र व्हायचं
बोलता बोलता वेळेच भानही विसरायचं

खरच प्रेम किती निरागस असत
दोघांच्या मदतीने फुलवायच फुल असत
शपथांच्या बंधात गुंफून
आयुष्यभरासाठी मनात साठवायच असत .

                                विजय वाठोरे सरसमकर
                                   9975593359