पावसाच्या धारा

Started by Mangesh Kocharekar, July 05, 2015, 09:20:33 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar



दाट अंधारुन येई, चौखूर उधळतो वारा
अवचित अंगणी पडती,गारेगार टपोर्या गारा
अन हळुच बरसू लागती,पावसाच्या धारा
चिंब पाऊस थंड वारा अंगावरी शहारा
हसते धरती सुटे दरवळ,श्वास फुले भरारा   
      गुरे वासरे पळती लगबग, चुकवीत पाऊस मारा
      संभ्रमित पक्षी मारती, झाडा भोवती चकरा
      चक चक करीत कोबंडी देई, पिल्लांस दुरुनी इशारा   
      कात टाकला नाग डोले, पाहावा त्याचा तोरा   
      आनंदाने न्हाती वेली ,दावती  वृक्ष फुलोरा 
आनंदाने मुले नाचती अंगणी, कुणी वेचती गारा
चिखल तुडवून काला करती, भिजे तिचा घागरा
लाजुनी चूर ती परते लगबग,वर्ण तिचा तो गोरा
केसामधूनी निथळे पाणी,थेंब चीपकती अधरा
मना भावतो तिचा चाळा , परी माझ्यावरी पहारा 
    हुरहूर माझ्या मना लागली, सिमाटावे तिच्या अधरा
    डोळ्यात पहावी फुलती स्वप्ने, स्वप्नात रंग भरावा
    हाती घेवून नाजुक तर्जनी, करावा थोडा चाळा
    श्वासात घ्यावा भरुनी गंध,  र्हीदायाचा नाद टिपावा
    पावसाच्या धारासंगे , मन मल्हार मोकळा गावा