$$$$ मन $$$$

Started by विजय वाठोरे सरसमकर, July 07, 2015, 08:53:05 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

$$$$ मन $$$$

मन उधान उधान
वाहत वाऱ्याच्या वेगान
आल तुझ्या हृदयात
ठेव थोडस जपून !

माहिती नव्हत नव्हत
धोका दिला काळजान
तुझाच दिलदार मी
ठेव मनात साठवून !

कस सांगाव खोट खोट
जो नाही आपला तयाची आठवण
तुला ना भरोसा ना जान
मलाही तू थोडस बघ आठवून !

आता झालायं खर खर
प्रेमापायी होईल सौभाग्याच लेण
तुझ्याच चाहुलीन गेला दिवसाचा सीन
माझ्यासाठी बघ तुझ्या मनास झुरवून !

काय म्हणाव म्हणाव
या मनाच मन लावण
तीचासाठीच भावनेला थमविन
माझ्यासाठीही कधी बघ मन लावून !

                                                  विजय वाठोरे सरसमकर
                                                   ९९७५५९३३५९