संपले ते जिवंत बालपण

Started by ashishavsare, July 07, 2015, 06:58:37 PM

Previous topic - Next topic

ashishavsare

संपले ते जिवंत बालपण, उरले फ़क्त खोटे शहाणपण
आयुष्यात सर्वत्र कुंपण, जगतोय आता मेलेले जीवन॥ धृ ॥

माझ्या मामाचे पत्र हरवले, ते कोणाला सापडले
अल्लड असले खेळ खेळले, बेभान होऊनि जीवन जगले
नव्हते जगण्यावर बंधन, निजले नव्हते कधी चिंतेत मन
संपले ते जिवंत बालपण, उरले फ़क्त खोटे शहाणपण ॥ १ ॥

शुभम करोती कल्याणम, आरोगयम् धन संपदा
एकत्र येउनी मित्रांसवे, आराधली होती शारदा
अमोलिक आजीची ती शिकवण, सुवासिक तो काळ चंदनवन
संपले ते जिवंत बालपण, उरले फ़क्त खोटे शहाणपण ॥ २ ॥

फिरती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊया
आजोबांच्या गोष्टी ऐकुया, मिश्किल तो निसर्ग जगया
जरी केले आता नवे मंथन, मिळणार नाही जगणे ते गावरण

कारण.....

संपले ते जिवंत बालपण, उरले फ़क्त खोटे शहाणपण
आयुष्यात सर्वत्र कुंपण, जगतोय आता मेलेले जीवन॥ ३ ॥

- आशीष अवसरे ©
ashishavsare@gmail.com
Reg No.:- MEM/SS 3170