येरे येरे पावसा

Started by शिवाजी सांगळे, July 07, 2015, 08:34:20 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा
व्हाईटचा देतो पैसा।

पैसा होईल खरा
बरस आता तू जरा।

तु पण ये गं सरी
पहातोय वाट दारी।

लवकर ये तू धावुनी
अंगण जावुदे भिजुनी।

लपंडाव झाला पुरा
घेवुन ये थोडा वारा।

ढकलेल वारा ढगाला
पाणी मिळेल शेताला।

फुलेल शेत जोमाने
शेतकरी जगेल सुखाने।

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९