पाषाण पाऊस

Started by Adityaajadhav, July 08, 2015, 11:13:31 AM

Previous topic - Next topic

Adityaajadhav

मोहरल्या अंगावरी पाऊस
नव तारुण्यातला,इतका
परिणामकारक
असूच शकणार नाही...
इवल्या इवल्या मुद्रांना
जपण्याचा प्रश्नच
येतो कुठे...

उरांत चिंब स्मृतिगंध,
काही थोर दुःख,पाषाणी,
तू अणु रेणूत इतस्तत
विखरुनी,सहानुभूतीचा,
परिणामचं केवळ
साधू शकशील...

नाही क्रियाशीलता
परिणामकारक तुझ्याकडे,
म्हणूनच...
दगडकपारीतल्या अतृप्त
रानफुलांची तृष्णा
तेवढी दूर कर,
काय माहीत,तुझ्या
नशिबाची मेहरनजर जर
तुझ्यावर झाली तर...

@आदित्य अ. जाधव,(नागूरकर)
०९४०४४००००४,
दि,०७-०७-२०१५,पुणे;
वेळ-१२:४८ मि,दुपारी,