-- मुलगी --

Started by SHASHIKANT SHANDILE, July 08, 2015, 12:20:37 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

आईला झाली मुलगी बापाला झाली जडं
म्हणूनं कां फेकली तिला डोंगरं दऱ्यातं
तिच्या जीवाला कसे कां नाही काही मोलं
कळेना कुणाला मुलीचं नातं हे अनमोलं
त्या मुलीलाही कशी जचेल हि जगरीतं
नका मागू मुलगी काही घडेल विपरीतं

आईला झाली मुलगी बापाला झाली जडं
म्हणूनं कां फेकली तिला डोंगरं दऱ्यातं
असे तिने का जगावे मागत मागतच खावे
सांगा सांगा लोकहो तिनं असे कसे हे जगावे
मनातल्या तिच्या आशा आकांशा पुरवावी
तिच्या बापाने तीला प्रेमाची मिठीही मारावी

आईला झाली मुलगी बापाला झाली जडं
म्हणूनं कां फेकली तिला डोंगरं दऱ्यातं
काय झाला दोषं तिचा लागे भोगं हे फेडावे
काय चुकलेहो तीचे तिला कुणी कां न सांगे
अश्या जगण्यापरिसं तिचं आता मेलेलचं बरं
भेदभावी जीवनाला तिनं आता सोडलेलं बरं

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!