**** पुरोगामिंचा वारसा ****

Started by विजय वाठोरे सरसमकर, July 09, 2015, 08:46:08 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

****  पुरोगामिंचा वारसा   ****

पुरोगामी विचारसरणी हवी आहे आता
त्याशिवाय तारणार नाही कोणतीही सत्ता

तथागत म्हणाले होते सत्य
समता अहिंसा शांतता पाळावे नित्य
फुलेंनी केला अस्पृश्यतेचा धिक्कार
दिला सर्वांना समान अधिकार

शाहूंनी दिला आरक्षणाचा हक्क
पाहुनी पुरोगामिंना मनु झाकला थक्क
मत सावित्रीने केली स्त्री शिक्षणाची सुरुवात
केली सर्व जातीवाद्यांवर मात

करुनी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना
दिली सर्वांना स्वातंत्र्याची कल्पना
कबिरांचे दोहे ऐकुनी जग झाले गुंग
दोह्यांमुळे सर्वांनी भरारी घेतली उत्तुंग

सर्वांचा वारसा टिकविला माझ्या भीमाने
सर्वधर्मसंमभाव बंधुत्व दाविले संविधानाने
नसता माझा भिवा तर राहिलो असतो गुलाम
भिमाईच्या भीमा तुम्हा कोटी कोटी प्रणाम !

                           विजय वाठोरे सरसमकर
                           9975593359
                           दि ०९/०७/२०१५


विजय वाठोरे सरसमकर

या कवितेत मला सर्वधर्मसमभाव हा शब्दा ऐवजी धर्मनिरपेक्षता हा शब्द अभिप्रेत होता , पण सर्वधर्मसमभाव  हा शब्द इथे चुकून आलाय ..............