जीवनात कधी कधी माणसाला बेधूंद व्हावं लागतं

Started by Ashish Patil, July 10, 2015, 12:50:19 PM

Previous topic - Next topic

Ashish Patil

जीवनात कधी कधी माणसाला
बेधूंद व्हावं लागतं
मनात कितीही दूःखं असलं तरी
चेहऱयावर मात्रं हसू ठेवावं लागतं
घडणाऱया गोष्टी घडणारच आहेत
दूःखाच्या काळात मनाला सावरावं लागतं
हसल कोणीतरी रडतांणा पाहूण
म्हणून डोळ्यातच अश्रूंना रोखावं लागतं
दूसऱयांच्या सुखात शामील होऊण नेहमी
बळजबरीनं खुष रहावं लागतं
जीवनात कधी कधी माणसाला
बेधूंद व्हावं लागतं
काटे घड्याळीचे थांबवूण
वेळेला कधी थांबवता येत नाही
विरूद्ध प्रवाहाच्या दिशेने माणसाला
कधीच पोहता येत नाही
मग येईल कोणीतरी सावरायला
या खोट्या आशेवर नेहमी जगावं लागतं
जीवनात कधी कधी माणसाला
बेधूंद व्हावं लागतं