वादळवाट

Started by pranitagre, July 10, 2015, 02:00:42 PM

Previous topic - Next topic

pranitagre

थोडी सागर निळाई
थोडे शंख नि शिंपले
कधी चांदणे टिपूर
तुझ्या डोळ्यांत वाचले

कधी उतरला चंद्र
तुझ्यामाझ्या अंगणात
स्वप्‍नपाखरांचा थवा
विसावला ओंजळीत

कधी काळोख भिजला
कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ
कधी हरवली वाट

वार्‍यापावसाची गाज
काळे भास गच्च दाट
कधी धूसर धूसर
एक वादळाची वाट.

-मंगेश कुळकर्णी
( शीर्षक गीत, मालिका- वादळवाट, वाहिनी- झी मराठी )