हरवलेली आई

Started by shrikrushna Gaikwad, July 10, 2015, 05:04:57 PM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

खुप एकल तुझ्या विषयी
तुझ्या सारख प्रेमच नाही
कोठे हरवलीस माझ्या जीवनातुन
माझ्या नशीबात तुझ प्रेमच नाही

पहिला शब्द बाळाचा
आई असतो एकलय मी
कोणता शब्द उचारलो मी
हे मलाच ठाउक नाही
कोठे हरवलीस माझ्या जीवनातुन
माझ्या नशीबात तुझ्या पदराची सावलीच नाही

कस शोधु मी तुला
तुला मी कधी पाहीलच नाही
कशी हाक मारु तुला
आई शब्द मला कोणी शीकवलाच नाही
कोठे हरवलीस माझ्या जीवनातुन
माझ्या नशीबात आई हा शब्द्च नाही

कस मानु मी हे
आई सर्वश्रेष्ठ आहे
कस मानु मी हे
आई सारख दैवत नाही
इतकी श्रेष्ठ आहेस तु तर
मला रस्त्यावर टाकुन कोठे ग गेलीस

खुप एकल तुझ्या विषयी
तुझे वर्णन करतानी शब्द ही कमी पडतात
विचारतो मी सर्व कवीना
जेव्हा मी आई आई करत रडतो
तेव्हा माझी आई का येत नाही ?

तुझ नाव नव्हत द्यायच मला
अनाथ शब्द का दिलास मला
जितक प्रेम आई तुझ्यात आहे
दुप्पट दुख अनाथ शब्दात आहे
कोठे हरवलीस माझ्या जीवनातुन
माझ्या नशीबात आईच नाही

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com