पहिलं प्रेम...

Started by niteshk, July 12, 2015, 11:59:45 AM

Previous topic - Next topic

niteshk

पहिलं प्रेम...

पहिलं प्रेम असतं अलगद उलघडण्यासाठी
स्वतःलाच स्वतःची नवी ओळख करून देण्यासाठी

पहिलं प्रेम असतं सांभाळून घेण्यासाठी
जुळवून घेत असताना गोंधळून जाण्यासाठी

पहिलं प्रेम असतं व्यक्त करण्यासाठी
सांगताना स्वतःची दमछाक करून घेण्यासाठी

पहिलं प्रेम असतं असतं क्षणिक सुखांसाठी
क्षणाक्षणांच्या सहवासात हरवून जाण्यासाठी

पहिलं प्रेम असतं वेडं जीव लावण्यासाठी
कोणाचे तरी मन जीवापाड जपण्यासाठी

पहिलं प्रेम असतं आठवणीत झूरण्यासाठी
गोड आठवणींमधे हरवून रमून जाण्यासाठी

पहिलं प्रेम असतं संपून जाण्यासाठी
एक सलती आठवण बनून ह्रदयात दडुन राहण्यासाठी

पहिलं प्रेम असतं विसरून जाण्यासाठी
पहाटेच्या दवबिंदू सारखं क्षणिक, विरून जाण्यासाठी

स्वलिखित