$$$ मंदाकिनी $$$

Started by विजय वाठोरे सरसमकर, July 12, 2015, 01:25:18 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

$$$  मंदाकिनी  $$$

तू
कधी दिसतेस आकाशातील चांदणी
कधी भासतेस पुनवेचा चंद्र
तुझा केशसंभार जणू
नक्षत्रांचा संच
तुला बघतच वाटे
तुझ्यावर जीव ओवाळून फेकावा
लागो ना तुला कुणाची नजर
स्मरत असतो तुझा तो धाडशी स्वभाव
तुझ्या मदभार्या यौवनाचा
दावी मजला प्रभाव
तूच आनंदिनी
तूच मंदाकिनी
आलीस माझिया जीवनी
सौभाग्य घेऊन
तुझ्या प्रीतीचा विंचू जसा चावला
तसा अंगांग शहारला
तुझा सहवास लाभला
मिळाले जीवनी यश .

                            विजय वाठोरे सरसमकर
                             9975593359