पावसा तु online ये ना एकदा ...!

Started by Rajesh khakre, July 12, 2015, 09:40:54 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

पावसा तु ऑनलाइन येना एकदा...!
जरा बघ ही सुकलेल्या पिकांची चेहरे
ही भेगाळलेली माती
तुझ्या वाटेकडे
डोळे लावून बसलेला शेतकरी
तु ही राजकारणी लोकांसारखा वागतोय हल्ली
आश्वासनाचे ढग खुप नेतोस माझ्या अपेक्षांच्या शेतावरुन
पण माझ्या डोळ्यांत मात्र आसवांचे पाणी असते नेहमी दर पावसाळी
हल्ली विश्वासच उडाला माझा तुझ्यावरचा
अन जगण्यावरचाही
पण माझ्यावरचे या मातीतले संस्कार मरु देत नाही
अन तु जगु देत नाही
तुझ्याकडे नाही का पावसा माझे उत्पन्न वाढेल यासाठी कुठला सातवा वेतन आयोग
जगणे खुप महाग झाले रे हल्ली
बरं तुझ्या ऑफिसचा पत्ता ही नाही माझ्याकडे
बसलो असतो आमरण उपोषणाला
हल्ली उपोषण केल्याशिवाय काहीच नाही मिळत येथे
मी फक्त नावाला राजा राहिलो रे आता या आमच्या कृषिप्रधान देशात
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

(कविचे नाव काढून कविता forward करण्याची तसदी घेऊ नये!!!)